मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेमध्ये सोहम स्कूलच्या खेळाडूंचे यश

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): क्रीडा व युवक सेवा
संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व थांग ता असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वयोगट १४, १७, व १९ वर्षे मुले व मुली आंतरशालेय शहर थांग ता मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धा नुकत्याच सोहम इंग्लिश स्कूल, सातारा परिसर येथे पार पडल्या.
स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा)
संघटनेचे राज्य अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक प्रा प्रविण आव्हाळे यांनी केल तर प्रमुख पाहूणे म्हणून मेसा संघटनेचे राज्य सरचिटणीस संदिप लघामे पाटील या वेळी उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्षा सुवर्णा आव्हाळे व शाळेचे उपमुख्याध्यापक प्रविण राऊत आदि मान्यवर उपस्थित होते.
विजयी (मुले): ओजस आव्हाळे, हर्षद पारखे, वेदांत पारखे,
आरव सिरसवाल, आर्यन मगर, प्रद्युग्न गांधाले, भावेश राठोड, देवराज चोपडे, अली शेख, अदनान शेख, सोहम जाधव, मोहित पारखे. मुली : स्वरा आव्हाळे, अनुष्का मगर, नेतल शर्मा, आराध्या गर्कल, सिद्धी मलेडिया, सोनल वानखेडे, अबोली पठारे, साक्षी कोल्हे, दूर्वा आरते, हर्षिता डोळस, धनश्री घायवट, रुपाली यादव. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिमा नरवडे, प्रिती वायकोस, पांडूरंग उडाण, सचिन ढेकळे, प्रिया आव्हाळे, सोहम आव्हाळे, मयुरेष आव्हाळे यांनी परिश्रम घेतले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions